तर दुसरीकडे काही फेक यूजर्स ट्रॉलकेजरीसारखे अकाऊंटवरून सेहवागला ट्रॉलू असोसिएशनचे अध्यक्ष जाहीर केले.
2/9
दरम्यान, सोशल मीडियावरील ट्रॉल अकाउंट बंद झाले पाहिजेत अशी चर्चा सध्या सुरु झाली. कारण विरोधकांना उत्तर देण्यासाठी सेहवाग पुरेसा असल्याचे म्हणले जात होते.
3/9
यावर सेहवागही शांत बसला नाही, त्याने मॉर्गनने रिप्लाय देताना पीटरसन अतिशय महान खेळाडू आहे, यात कोणतीच शंका नाही. मात्र, तो इंग्लडचा नाही, तर दक्षिण आफ्रिकन वंशाचा आहे. विशेष म्हणजे तुमच्या तर्कानुसार, इंग्लंडने 2007सालीच विश्व चषक जिंकणे गरजे होते. तुम्हाला आमच्यापासून आणि आमचा आनंद साजरा करण्यावर प्रॉब्लेम काय आहे असा प्रश्न विचारला.
4/9
सेहवागच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मॉर्गनने आणखी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने केविन पीटरसनचा उल्लेख करून, पीटरसन अजून खेळत असता. तर इंग्लंडने विश्व चषक नक्कीच कमावला असता. ज्याप्रमाणे आम्ही टी 20 चा विश्वचषक जिंकला होता, आणि पीटरसन सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होतं. असं म्हणलं होतं.
5/9
सेहवागने मॉर्गनच्या या ट्वीटला आपल्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं. आम्ही कोणत्याही लहान गोष्टीचा आनंद जल्लोषात साजरा करतो. पण तिकडे इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता असूनही अद्याप विश्वचषक जिंकू शकलेला नाही. पण तरीही हा संघ क्रिकेट खेळतो, हे दुर्दैवी नाही का? असा प्रश्न त्याने मॉर्गनला विचारला.
6/9
मार्गनने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने केलेल्या प्रदर्शनावर टीकेची झोड उठवणारे ट्वीट केले. त्याने आपल्या ट्वीटमध्ये, 120 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाने ऑलिम्पिकमध्ये 2 पराभवाची पदके मिळवली. त्याचा किती मोठा जल्लोष करत आहेत? हे सर्वात दुर्दैवी असल्याचं आपल्या त्या ट्वीटमध्ये म्हणलं होतं.
7/9
भारताचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि ब्रिटिश पत्रकार पीयर्स मॉर्गन यांच्यात पुन्हा ट्विटर युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. पीव्ही सिंधूच्या ट्वीटवरून मॉर्गनला निरुत्तरीत केल्यानंतरही मॉर्गनने पुन्हा टिवटिवाट करत सेहवागशी पंगा घेतला आहे.
8/9
इंग्लड आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान विरोधात ४४४ धावा ठोकल्यानंतर मॉर्गनने सेहवागला उद्देशून ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये मॉर्गनने विरुला १ लाखाचं चॅलेंज दिलं आहे. तसेच इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करण्यापूर्वीच विश्व चषक जिंकेल असं म्हणलं आहे. यावर अद्याप सेहवागचं उत्तर आलेलं नसलं तरी अनेक भारतीय ट्रॉलरनी मॉर्गनला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
9/9
मॉर्गनने यापूर्वीही सेहवागशी पंगा घेतला होता. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर भारतीयांची खिल्ली उडवली होती. यावर सेहवागने आपल्या हटके स्टाईलने उत्तर दिले होते.