एक्स्प्लोर
Advertisement
#Metoo चं वादळ आता क्रिकेटविश्वात, बीसीसीआयच्या सीईओंवर लैंगिक शोषणाचे आरोप
बीसीसीआचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्याआधी जोहरी डिस्कवरी नेटवर्क एशिया पॅसिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून काम पहात होते.
मुंबई : #Metoo चं वादळ आता काही केल्या थांबत नाही आहे. कला, राजकारणाबरोबरच क्रिकेटविश्वातही मीटूचं वादळ पोहचलंय. बीसीसीआचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने जोहरी यांच्याकडे लैंगिक शोषणाच्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे.
प्रशासकीय समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल जोहरी याच्यांवर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचे समोर आले आहे. परंतु जोहरी याच्यांवरील आरोप हे त्यांच्या मागील नोकरीशी संबंधित आहे. पण हा देखील मीटू मोहिमेचाच भाग आहे.” बीसीसीआचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्याआधी जोहरी डिस्कवरी नेटवर्क एशिया पॅसिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून काम पहात होते. तत्पूर्वी नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तानं आरोप केल्यानंतर आलोकनाथ यांच्यावरही अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले .सुभाष घई यांच्यावरही अभिनेत्री केट शर्मा यांनी गंभीर आरोप लावले आहेत. या प्रकरणातून काही राजकीय मंडळीही सुटलेली नाहीत. परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. यानंतर आता हे मीटूचं वादळ क्रिकेटच्या विश्वात पोहचलं आहे.Committee of Administrators of the BCCI asks Rahul Johri to submit his explanation within a week over the sexual harassment allegations made against him. pic.twitter.com/lTqpQxUyu4
— ANI (@ANI) October 13, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement