एक्स्प्लोर
रवींद्र जाडेजा पुन्हा आऊट
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधले अखेरचे दोन वन डे सामने अनुक्रमे बंगळुरू (28 सप्टेंबर) आणि नागपूरमध्ये (1 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहेत.
मुंबई: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा टीममधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे माघार घेतलेला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे सामन्यांसाठी टीम इंडियात परतला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधले अखेरचे दोन वन डे सामने अनुक्रमे बंगळुरू (28 सप्टेंबर) आणि नागपूरमध्ये (1 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही सामन्यांसाठीच्या पंधरासदस्यीय भारतीय संघात अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे.
चेन्नईच्या पहिल्या वन डेच्या आदल्या दिवशी फुटबॉल खेळताना त्याचा डावा घोटा दुखावला होता. त्यामुळं अक्षरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन डे सामन्यांतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्याऐवजी भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या रवींद्र जाडेजाला पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे.
जाडेजा नाराज, ट्विटरवर नाराजी दर्शवून ट्वीट डिलीट
दरम्यान, सलामीवीर शिखर धवन पुढचे दोन वडेही खेळणार नाही. पत्नीच्या आजारपणामुळे त्याने पहिल्या तीन सामन्यांतून माघार घेतली होती. मात्र आता पुढचे दोन सामन्यांसाठीही तो उपलब्ध नसेल.
भारतीय संघ :
- विराट कोहली (कर्णधार)
- रोहित शर्मा
- के एल राहुल
- मनिष पांडे
- केदार जाधव
- अजिंक्य रहाणे
- एम एस धोनी
- हार्दिक पांड्या
- कुलदीप यादव
- यजुवेंद्र चहल
- जसप्रीत बुमरा
- भुवनेश्वर कुमार
- उमेश यादव
- मोहम्मद शमी
- अक्षर पटेल
धवनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 3 वन डे सामन्यांमधून माघार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement