एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
28 वर्षांनी ऑस्ट्रेलिया मायदेशात पहिली कसोटी हरली
पर्थ : कागिसो रबादानं काढलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर 177 धावांनी मात केली. याबरोबरच द. आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 1988 नंतर पहिल्यादाच ऑस्ट्रेलियानं मायदेशातील मालिकेची पहिली कसोटी गमावली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 539 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 361 धावांवरच आटोपला. उस्मान ख्वाजाच्या 97 धावा, पीटर नेव्हिलची नाबाद 60 धावांची खेळी यामुळे ऑस्ट्रेलियानं इथवर मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेच्या कॅजिसो रबादानं दुसऱ्या डावात पाच विकेट्स काढून आपल्या टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. डेल स्टेनच्या गैरहजेरीत रबादानं दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. रबादालाच सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याआधी श्रीलंकेतील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 3-0 अशी पराभवाची नामुष्की ओढवली. 28 वर्षांत पहिल्यादाच ऑस्ट्रेलियानं मायदेशातील मालिकेची पहिली कसोटी गमावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement