एक्स्प्लोर

डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानला झोडपले, त्रिशतकी खेळीसह डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडीत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला.

अॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबूशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 361 धावांची भागीदारी रचली. वॉर्नरने आज पाकिस्तानी गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला होता. त्याला लॅबूशेनने चांगली साथ दिली. डेव्हिड वॉर्नरने लॅबूशेननंतर स्टिव्ह स्मिथसोबत 121 तर मॅथ्यू वेडसोबत 99 धावांची भागीदारी रचली. लॅबूशेनने 238 चेंडूंत 22 चौकारांसह 162 धावांची खेळी उभारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची सहा बाद 96 अशी दाणादाण उडाली आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने कसोटी कारकीर्दीतले पहिले त्रिशतक झळकावून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक साजरं करणारा तो ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज ठरला. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत नाबाद 335 धावांची खेळी उभारली. त्याने 418 चेंडूंमधली ही खेळी 39 चौकार आणि एका षटकाराने सजवली. वॉर्नरने ही कामगिरी बजावून ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून 334 धावांचा उच्चांक आजवर डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलरच्या नावावर होता. तो विक्रम त्याने आज मोडीत काढला आहे. तसेच अॅडलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रमही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. हा रेकॉर्डदेखील वॉर्नरने मोडीत काढला आहे. 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाने 589 धावांचा डोंगर उभारल्यानंतर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. दिवसअखेर पाकिस्ताची अवस्था 6 बाद 96 अशी झाली. पाकिस्तानकडून बाबर आझम एका बाजूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धैर्याने सामना करत आहे. तो सध्या नाबाद 43 धावांवर खेळत आहे. त्याच्याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget