IND vs PAK: अर्धशतक झळकावताच कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी; रोहित शर्माला टाकलं माग
Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील दुसरा सामना खेळला जातोय.

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील दुसरा सामना खेळला जातोय. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकांत सात विकेट्स गमावून 181 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं त्याच्या कारकिर्दीतील 32वं आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासह विराट कोहलीनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहचलाय.
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा मान रोहित शर्माकडं होता. रोहितनं आजवर 31 अर्धशतकं झळकावली आहेत. परंतु, पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 सामन्यात विराटनं त्याच्या कारकिर्दीतील 32वं अर्धशतक झळकावून रोहित शर्माला मागं टाकलं आहे. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 31 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, डेविड वॉर्नर चौथ्या (23 अर्धशतक) आणि मार्टिन गप्टिल (22 अर्धशतक) पाचव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतक-
| क्रमांक | फलंदाज | अर्धशतक |
| 1 | विराट कोहली | 32 |
| 2 | रोहित शर्मा | 31 |
| 3 | बाबर आझम | 31 |
| 4 | डेविड वार्नर | 23 |
| 5 | मार्टिन गप्टिल | 22 |
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.
हे देखील वाचा-
Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहली मोडणार सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम? शोएब अख्तर म्हणतोय...























