IND vs PAK Playing 11: हार्दिकचं पुनरागमन, रवि बिश्नोईला संधी, कार्तिकला विश्रांती; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
IND vs PAK Toss Report: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सुपर-4 फेरीतील दुसरा सामना खेळला जात आहे.
IND vs PAK Toss Report: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सुपर-4 फेरीतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, मागच्या रविवारी झालेल्या गट सामन्यात भारतानं पाकिस्तानच्या संघाला पाच विकेट्सनं धुळ चारली होती. भारत आज पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. तर, याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनं मैदानात उतरेल.
भारताच्या संघात तीन तर, पाकिस्तानच्या संघात एक बदल
आजच्या सामन्यात भारताच्या संघात तीन तर पाकिस्तानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. भारताच्या संघात रवींद्र जाडेजाच्या जागेवर हार्दिकचं संघात पुनरागमन झालाय. तर, आवेश खान आणि दिनेश कार्तिक यांच्याऐवजी शुभमन गिल आणि रवि बिश्नोईला संघात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तर, पाकिस्तानच्या संघात एक बदल पाहायला मिळतोय. शाहनवाझ दहनीच्या जागेवर मोहम्मद हसनैनला संघात सामील करण्यात आलंय.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 4 सप्टेंबर ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातोय. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी एबीपी माझ्याच्या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जवळपास सर्वच सामने रोमहर्षक ठरलेत. परंतु, दोन्ही दोन्ही संघ आशिया चषक आणि आयसीसी एव्हेंटमध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध खेळतात.दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 16 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 9 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, पाकिस्तानला पाच सामने जिंकता आली आहेत. यातील दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. आशिया चषकातील आकडेवारी पाहता भारताचं पारडं जडं दिसतंय.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.
हे देखील वाचा-
IND vs PAK, Asia Cup: विश्वविक्रमापासून कर्णधार रोहित शर्मा फक्त 12 धावा दूर!