एक्स्प्लोर
अमित मिश्राचा नवा विक्रम, अश्विनलाही टाकलं मागे!
मुंबई: भारत वि. न्यूझीलंडविरद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू अमित मिश्रानं डग ब्रेसवेलची बळी घेऊन एक नवा विक्रम आपल्या नावावर केला.
न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद करुन मिश्रानं आपल्या वनडे कारकिर्दीतील 50 बळी घेतल्या. त्यानं अवघ्या 32 वनडे सामन्यात 50 बळी घेण्याचा कारनामा केला आहे. तसंच सर्वात कमी सामन्यात 50 बळी घेणारा तो पहिला भारतीय फिरकीपटू बनला आहे. मिश्राच्या आधी हा विक्रम अश्विनच्या नावावर जमा होता. त्याने 34 सामन्यात 50 बळी घेतले होते.
दरम्यान, याबाबतीत टीम इंडियातील गोलंदाजांचा विचार केल्यास या यादीत वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा पहिला क्रमांक लागतो. त्यानं अवघ्या 23 सामन्यात 50 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. याच यादीमध्ये मोहम्मद शमी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 29 सामन्यात 50 बळी घेतले होते. तर इरफान पठाणनं 31 सामन्यात 50 बळी घेतले होते. तर जहीर खाननं 34 सामन्यात हा पराक्रम केला होता. या यादीत आता मिश्रा चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement