(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबी डिव्हिलियर्सचं कौतुकास्पद पाऊल! भारतातील गरीब मुलांना करणार मदत
Ab De Lilliers : माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स हा भारतातील गरीब मुलांना मदत करणार आहे. यासाठी त्याने भारतातील एका संस्थेसोबत एक करार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो भारातातील वंचित मुलांना मदत करणार आहे.
Ab De Lilliers : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. एबी डिव्हिलियर्स हा भारतातील गरीब मुलांना मदत करणार आहे. यासाठी त्याने भारतातील एका संस्थेसोबत एक करार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो भारातातील वंचित मुलांना मदत करणार आहे. मेक अ डिफरन्स या संस्थेसोबत मिळून डिव्हिलियर्स भारतातील वंचित मुलांना आपला वेळ देणार आहे. त्यासाठी या संस्थेसोबत त्याचा एक करार झाला आहे.
एबी डिव्हिलियर्स हा सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्त झाला आहे. आयपीएलमध्ये देखील त्याने तुफान फटकेबाजी केली होती. परंतु, सध्या त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृ्ती घेतली आहे.
मेक अ डिफरन्स ही संस्था काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी काम करते. ही संस्था 10 वर्षे ते 28 वर्षे वयोगटातील मुलांसोबत काम करते. सोबतच स्थिर उत्पन्नाचे मॉडेल विकसित करण्यावर काम करत आहे. एबी डिव्हिलियर्स देखील आता या संस्थेसोबत काम करणार आहे. या संस्थेसोबत करार झाल्यानंतर डिव्हिलियर्स म्हणाला, मला भारतात खूप प्रेम मिळाले आहे. मी नेहमी या देशाला काहीतरी परत देण्याचा मार्ग शोधत आहे. या शोधात मी मेक अ डिफरन्स एनजीओमध्ये सहभागी झालो आहे. या संस्थेच्या माध्यमातून मी भारतातील गरीब मुलांना मदत करणार आहे.
मेक अ डिफरन्स या संस्थेसोबत करार झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. ही संस्था गरीब कुटुंबातील मुलांना मदत करते. जोपर्यंत ते कुटुंब सक्षम होत नाही तोपर्यंत ही संस्था त्या मुलांची जबाबदारी घेते. मी या संस्थेतील दोन तरूणांना मार्गदर्शन करणार आहे. यातील एकाचे नाव अयान असे आहे. अयान हा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील असून तो अंडर 19 मध्ये खेण्यासाठी तयारी करत आहे. तर बंगळूरू येथे पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीला देखील मदत करणार आहे.
एबी डिव्हिलियर्सच्या या निर्णयाचं सध्या सोशल मीडियावरून कौतुक होत आहे. तो सोशल मीडियावरून देखील अनेकवेळा त्याचे भारतावरील प्रेम दाखवून देत असतो. शिवाय आता त्याने भारतातील गरीब मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या