(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : पंजाब किंग्सचं मुख्य प्रशिक्षक पद इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळण्याची शक्यता, अनिल कुंबळेची घेऊ शकतो जागा
IPL 2023 : पंजाब किंग्सचा मुख्य प्रशिक्षक अर्थात हेड कोच अनिल कुंबळे याचं कॉन्ट्रॅक्ट सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्याचा कॉन्ट्रॅक्ट संघ व्यवस्थापन वाढवणार नसल्याची महितीही समोर येत आहे.
IPL 2023, Anil Kumble : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचा हेड कोच अर्थात मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे बदलला जाऊ शकतो. त्याचं कॉन्ट्रॅक्ट सप्टेंबरमध्ये संपत असून समोर येणाऱ्या माहितीनुसार त्याचं कॉन्ट्रॅक्ट संघ व्यवस्थापन वाढवणार नसल्याची महितीही समोर येत आहे. त्यामुळे आता पंजाब संघाला नवा हेड कोच मिळू शकतो. दरम्यान पंजाबचा नवा हेड कोच म्हणून इंग्लंडचा माजी कर्णधार आणि नुकतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याचं नाव समोर येत आहे.
पंजाब किंग्स संघाने आयपीएल इतिहासात आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवलेलं नाही. इतकच नाही तर 2014 नंतर आतापर्यंत एकदाही हा संघ साधा प्लेऑफपर्यंतही पोहोचलेला नाही. आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्सचा संघ (तेव्हाची किंग्स इलेव्हन पंजाब) फायनलमध्ये पोहोचली होती पण खिताब जिंकू शकली नव्हती. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार पंजाब किंग्स त्यांचा हेड कोच अनिल कुंबळेचं कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नसून इयॉन मोर्गन तसंच ट्रेवर बेलिस सारख्या माजी दिग्गजांचं नाव आता समोर येत आहे.
इयॉन मॉर्गनला मिळू शकते नवी जबाबदारी
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसताना त्याने काही महिन्यांपूर्वी वयाच्या 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेतली. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन आयपीएलमध्ये केकेआर संघाचा कर्णधार राहिला असून आता त्याला एक नवी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
चंद्रकांत पंडित केकेआर संघाचा कोच
आगामी आयपीएलसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने चंद्रकांत पंडित यांना ब्रँडन मॅक्युलम याच्या जागी हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. चंद्रकांत पंडित यांनी त्याच्या प्रशिक्षणाखाली मध्य प्रदेशला रणजी ट्रॉफी जिंकवून दिली. दुसरीकडे मॅक्युलम इंग्लंड संघाचा कोच झाल्याने आता त्याच्याकडून ही जबाबादारी पंडित यांना दिली गेली आहे.
हे देखील वाचा-