Asia Cup 2022 : दीपक चाहरला आशिया कपसाठी संधी मिळणार? समोर आली महत्त्वाची माहिती
Asia Cup 2022: दीपक चाहरने बऱ्याच महिन्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात पुनरागमन केलं आहे. विशेष म्हणजे त्याने पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळवला असल्याने आता आगामी आशिया कपमध्ये त्याला खेळवण्याबाबत चर्चा सुरु आहे.

Deepak Chahar, Asia Cup 2022 : भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणारा सामनावीर दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीनंतर चांगल्या फॉर्मात दिसत आहे. जवळपास सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आता दीपक आगामी आशिया कपमध्ये टीम इंडियात असेल का? या चर्चांना उधाण आलं आहे. 15 सदस्यीय संघाशिवाय तीन राखीव खेळाडूंमध्ये त्याचं नाव असलं तरी त्याला अंतिम संघात घ्यावं अशी मागणी फॅन्स करत आहेत. अशात एक महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे.
इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार दीपक चाहरला आशिया कपमध्ये टीम इंडियामध्ये संधी दिली जाऊ शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सिलेक्टर्स दीपक चाहरच्या फॉर्म आणि फिटनेसवर लक्ष देऊन आहेत. त्याला आशिया कपमध्ये भारतीय संघात खेळवण्याबाबत विचारही सुरु आहे.
बीसीसीआयच्या एका सिलेक्टरने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ''तुम्ही कोणत्याही खेळाडूला थेट आशिया कपसारख्या स्पर्धेसाठी नाही निवडू शकत. तो अजूनही दुखापतीतून सावरत आहे. जर खेळाडू दुखापतीतून सावरला आहे, त्याला आपला फिटनेस आणि फॉर्म दाखवण्यासाठी एखादी टूर्नांमेंट तरी खेळावी लागते.''
आशिया कपमध्ये खेळू शकतो दीपक
रिपोर्टमधील माहितीमध्ये असंही सांगितलं गेलं आहे की, 'जर दीपक चाहर त्याचा फिटनेस चांगला ठेवण्यासह फॉर्ममध्ये असल्यास आशिया कप खेळू शकतो. दीपकने स्वत:ही मान्य केलं आहे की, त्याला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे.' याशिवाय भारताचे आघाडीचे गोलंदाज हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या फिटनेसवरही दीपकचं खेळणं अवंलंबून आहे.
आशिया कपसाठी कसा आहे भारतीय संघ?
यंदाच्या आशिया कप 2022 साठी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली असून नेमकी टीम कशी आहे पाहूया...
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
