India vs England, 3rd Test : 3 बाद 33 वरून टीम इंडियाचं कमबॅक अन् इंग्रजांची 90 वर्षात दुसऱ्यांदा शरमेनं मान खाली गेली!
या विजयासह रोहित ब्रिगेडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
India vs England, 3rd Test : राजकोट कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 434 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ हतबल दिसत होता.चौथ्या दिवसाच्या (18 फेब्रुवारी) अखेरच्या सत्रात इंग्लंडचा संघ 122 धावांवर गडगडला. या विजयासह रोहित ब्रिगेडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडचा 1934 नंतर कसोटी इतिहासातील सर्वात मोठा दारुण पराभव आहे.
कसोटी इतिहासातील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी डिसेंबर 2021 मध्ये सर्वात मोठा विजय झाला होता. त्यानंतर वानखेडे कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला. मार्क वुडने दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक 33 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. कुलदीप यादवनेही दोन बळी घेतले.
यशस्वीने दुसऱ्या डावात द्विशतक झळकावले
चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी मिळून जवळपास तासभर इंग्लिश गोलंदाजांना अडचणीत आणले. गिल आपले शतक पूर्ण करेल असे वाटत होते पण कुलदीप यादवसोबत झालेल्या गैरसमजामुळे तो धावबाद झाला. गिलने 151 चेंडूत 91 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
गिल बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल क्रीझवर आला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात शतक झळकावल्यानंतर जैस्वाल निवृत्त झाला. मात्र, यादरम्यान रेहान अहमदच्या चेंडूवर जो रूटकडे झेलबाद झालेल्या कुलदीप यादवची विकेटही भारताने गमावली. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान यांनी मिळून भारताची स्थिती मजबूत केली.
यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 172 धावांची नाबाद भागीदारी केली. यशस्वीने 236 चेंडूत 214 धावांची नाबाद खेळी खेळली. यशस्वीने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 12 षटकार मारले. तर शुभमन गिलने 91 आणि सर्फराज खानने नाबाद 68 धावा केल्या.
इंग्लंडचा सर्वात मोठा कसोटी पराभव
- 562 वि. ऑस्ट्रेलिया द ओव्हल 1934
- 434 वि. इंडिया राजकोट 2024
- 425 वि. वेस्ट इंडिज मँचेस्टर 1976
- 409 वि ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स 1948
- 405 वि ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स 2015
भारतासाठी धावांनी सर्वात मोठा कसोटी विजय
- 434 वि. इंग्लंड राजकोट 2024
- 372 वि. न्यूझीलंड मुंबई 2021
- 337 वि. साऊथ आफ्रिका दिल्ली 2015
- 321 वि न्यूझीलंड इंदूर 2016
- 320 वि. ऑस्ट्रेलिया मोहाली 2008
इतर महत्वाच्या बातम्या