एक्स्प्लोर
IPL मधील कामगिरीची पावती, या खेळाडूंची भारतीय संघात निवड
1/6

सिद्धार्थ कौल : सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धार्थ कौलने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांना रोखणाऱ्या प्रमुख गोलंदाजांपैकी तो एक आहे. सिद्धार्थ कौलची इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
2/6

या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना आपल्या कामाची पावती मिळाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
3/6

दरम्यान, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणाऱ्या सिद्धार्थ कौलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.
4/6

करुण नायर : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्रिशतक ठोकत चर्चेत आलेला करुण नायर नंतर गायबच झाला. मात्र या आयपीएल मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या करुण नायरची अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे. करुण नायरने यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये 132.59 च्या स्ट्राईक रेटने 240 धावा केल्या आहेत.
5/6

अंबाती रायडू : टीम इंडियात स्थान तर मिळवलं, मात्र कामगिरीत सातत्य न राखल्यामुळे संधी न मिळालेल्या अंबाती रायडूचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. यावर्षी आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 151.61 च्या स्ट्राईक रेटने 423 धावा केल्या आहेत. रायडूची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
6/6

नवी दिल्ली : टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना, इंग्लंड दौरा आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत करुण नायरचंही भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.
Published at : 08 May 2018 07:07 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























