एक्स्प्लोर
PHOTO: वाराणसीतील खिरकिया घाट असेल पर्यटकांचं नवं आकर्षण, रुपडं बदलण्याचं नियोजन
1/5

स्टेशन आणि विमानतळावरुन थेट या घाटावर वाहने येणार असून त्यांच्या पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. अशा प्रकारची पार्किंगची सोय इतर कोणत्याही घाटावर नाही. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरायची सोयही करण्यात येणार आहे.
2/5

या घाटावर एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. काशी विश्वनाथ मंदिराचे तिकीट, वॉटर स्पोर्ट्स, लायब्ररी, मॉर्निंग वॉक, योगा, नौकाविहार, फूड प्लाझा तसेच अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील.
3/5

वाराणसीतील खिरकिया घाटाच्या विकासासाठी 35.83 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून यामुळे 11.5 एकर परिसराचा जुलै 2021 पर्यंत चेहरामोहरा बदलणार आहे. या घाटाच्या विकासाचं काम प्लानर इंडिया या कंपनीला देण्यात आलं आहे.
4/5

गंगा किनारी वसलेल्या अर्धचंद्राकार घाटांचं मनमोहक दृष्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. जगाच्या नकाशावर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लौकिक करण्यासाठी या परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
5/5

हा घाट विकसित करताना याच्या जुन्या बांधकामाला कोणताही धक्का न लावता इको-फ्रेन्डली पध्दतीनं याचं रुपडं पालटण्यात येणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Published at :
आणखी पाहा























