एक्स्प्लोर

IPL 2023, MI vs RCB : विराट-फाफची वादळी अर्धशतके, मुंबईचा 8 विकेटने पराभव

MI vs RCB, Match Highlights : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

MI vs RCB

1/11
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले.

2/11
मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.

3/11
विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या फलंदाजीपुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी दिसत होती. या दोघांच्या फटकेबाजीपुढे मुंबईच्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकात 148 धावांची भागिदारी केली. या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला

4/11
फाफ डु प्लेसिस याने 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद होता.

5/11
171 धावांचा बचाव करताना मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. मुंबईच्या गोलंदाजीत बुमराहच्या धारधार गोलंदाजीची कमी दिसत होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजामध्ये धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली.

6/11
बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. पण जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीत धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ यांनी जोफ्राची पिटाई केली. जोफ्राच्या चार षटकात दोघांनी 33 धावा वसूल केल्या.

7/11
मुंबईकडून अरशद खान आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. अरशद खान याने फाफ याचा अडथळा दूर केला. तर कॅमरुन ग्रीन याने दिनेश कार्तिकला बाद केले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजी प्रभावहीन ठरली.  जेसन बेहरडॉफ, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, ऋतिक शौकिन यांना विकेट घेता आली नाही आणि धावाही रोखता आल्या नाहीत. पियुष चावला याने 4 षटकात फक्त 26 धावा दिल्या पण विकेट घेता आली नाही.

8/11
दरम्यान, तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही.

9/11
मुंबई इंडियन्सचा गेल्या हंगामातील हिरो तिलक वर्मा याने  यंदाच्या हंगामतील पहिल्याच सामन्यात झुंझार खेळी केली. तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक झळकावले. एका बाजूला विकेट पडत तिलक वर्मा याने संयमी आणि आक्रमकपणे अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने नेहाल वढेरासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने दबावात अर्धशतक झळकावले. तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले.

10/11
कर्णधार रोहित शर्माला कर्णधाराला साजेशी फलंदाजी करता आली नाही. इशान किशन आणि कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट फेकली. रोहित शर्माने दहा चेंडूचा सामना करताना फक्त एक धाव केली. आकाशदीपने रोहित शर्माला बाद केले.

11/11
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ईशान किशन याने 13 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. मोहम्मद सिराज याने ईशान किशनचा अडथळा दूर केला. जगातील आघाडीचा टी 20 खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. ब्रेसवेल याने सूर्याचा अडथळा दूर केला. ऋतिक शौकिन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो पाच धावा काढून तंबूत परतला.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Embed widget