एक्स्प्लोर

Shirdi Trust Provide 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत

Shirdi Sai Baba Trust Provide RS 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: मुंबई उच्च न्यायालयानं श्री साई बाबा संस्थानला अभिनेत्याच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे.

Shirdi Sai Baba Trust Provide RS 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: 'शिर्डी के साईं बाबा' (Shirdi Ke Sai Baba) फेम दिग्गज अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती गंभीर असून गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 1977 मध्ये आलेल्या 'शिर्डी के साईं बाबा' या चित्रपटात साई बाबांची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले सुधीर दळवी हे बऱ्याच काळापासून आजारी आहेत आणि जीवघेण्या संसर्गाशी झुंजत आहेत. त्यांना सध्या त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना मदतीचं आवाहन केलेलं. अशातच आता अभिनेत्याच्या मदतीसाठी शिर्डी संस्थान पुढे आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं श्री साई बाबा संस्थानला (Shri Saibaba Sansthan Trust Shirdi) अभिनेत्याच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे.

शिर्डी संस्थानानं अभिनेत्याच्या उपचारासाठी मदत देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयानं श्री साई बाबा संस्थानला त्यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे. सुधीर दळवी 8 ऑक्टोबरपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबानं अलीकडेच त्यांच्या उपचारांसाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली होती. ज्यावेळी ऋषी कपूर यांची लेक आणि अभिनेता रणबीर कपूर यांची बहीण रिद्धिमा कपूर पुढे आलेली. तिनं अभिनेत्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला. अशातच आता शिर्डी संस्थानही अभिनेत्याला आर्थिक मदत करणार आहे. 

सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी ट्रस्टनं याचिका दाखल केली होती. मागील आदेशानुसार, ट्रस्टनं खर्चासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार होती. अशातच आता शिर्डी संस्थानाच्या याचिकेतील मागणीला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. 

सुधीर दळवी यांच्या उपचारांबद्दल उच्च न्यायालय काय म्हणाले? 

स्क्रीन'नं दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस. वेणेगावकर यांच्या खंडपीठानं म्हटलंय की, "ट्रस्ट खर्च उचलू शकते. लोकांची आस्था आणि दिग्गज अभिनेते (सुधीर दळवी) यांनी साकारलेली भूमिका, साई बाबांनी लोकांसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं कार्य लक्षात घेता, अभिनेत्याला मदत केली जाऊ शकते..."

साईबाबांच्या ट्रस्टनं मागितलेली 11 लाखांची मदत देण्याची परवानगी 

खंडपीठानं परवानगी देताना म्हटलं की, श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) कायदा, 2004 च्या कलम 17(2)(2)(o) मध्ये मानवतेच्या कल्याणासाठी धर्मादाय कार्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. ट्रस्टनं सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्याची परवानगी मागितली होती. ट्रस्टचे वकील अनिल एस. बजाज यांनी युक्तिवाद केला की, सुधीर दळवी यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय न्यायालयानं स्थापन केलेल्या तात्पुरत्या समितीनं घेतला आहे. सुधीर दळवी यांना सेप्सिसचा त्रास आहे आणि त्यांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता आहे...

साई बाबा ट्रस्टनं 15 लाख रुपयांची मदत करण्याची परवानगी मागितली

वकिलानं पुढे स्पष्ट केलं की, 86 वर्षीय सुधीर दळवी यांनी 'शिर्डीचे साई बाबा' या चित्रपटात श्री साई बाबांची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना संपूर्ण भारतात आठवलं जातं. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, ट्रस्टला 30 ऑक्टोबर 2025 रोजी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मागणारं पत्र मिळालं. त्यानंतर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं ट्रस्टला एक नवं शपथपत्र दाखल करण्यास सांगितलंय ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रुग्णालयाचे बिल, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांनी उपचार घेतले आहेत, हे सिद्ध करणारे कागदपत्रं सादर करण्यास सांगितलं.

सुधीर दळवी यांच्या पत्नी म्हणाल्या की, "ते अंथरुणाला खिळलेत..." 

सुधीर दळवी यांच्या पत्नीनं त्यांच्या आजाराचं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, ते अंथरुणाला खिळलेले आहेत आणि दोन केयरटेकर आणि एका फिजियोथेरेपिस्टच्या मदतीनं घरीच त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यांची प्रकृती एक वर्षानंतरच सुधारेल. त्यानंतर खंडपीठानं म्हटलंय की, "आम्ही मान्य करतो की, ज्येष्ठ अभिनेत्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आम्ही अर्जदार संस्थेला सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी 11 लाख रुपयांची रक्कम देण्याची परवानगी देतो..."

सुधीर दळवी यांच्या उपचाराच्या खर्चामुळे कुटुंब आर्थिकरित्या पूर्णतः कोलमडलं 

टेली चक्करनं दिलेल्या वृत्तानुसार, सुधीर दळवी यांच्या उपचारांवर 10 लाख रुपये खर्च झाले होते. त्यांच्या उपचारांमुळे कुटुंब इतकं आर्थिकदृष्ट्या कोलमडलंय की, त्यांना जनतेकडून आर्थिक मदत घ्यावी लागली. कुटुंबानं चित्रपट उद्योगाकडून तसेच सुधीर दळवी यांच्या चाहत्यांकडून आणि इतर ओळखीच्या लोकांकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली होती.

सुधीर दळवी यांची कारकीर्द, टीव्ही शो आणि चित्रपट

सुधीर दळवी यांच्या कारकिर्दीत, त्यांनी रामानंद सागर यांच्या टीव्ही मालिका 'रामायण'मध्ये महर्षी वशिष्ठ यांची भूमिका साकारली होती आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, साईबाबांच्या त्यांच्या भूमिकेमुळेच ते सर्वांचे प्रिय झाले. ते 'बुनियाद', 'भारत एक खोज', 'मिर्झा गालिब', 'चाणक्य' आणि परिक्षित साहनी यांच्या 'जुनून' या शोमध्येही दिसले. सुधीर दळवी यांनीही अनेक चित्रपट केले, पण त्यांना टीव्हीवरून लोकप्रियता मिळाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget