एक्स्प्लोर

Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?

Gold price hike dollar rate: सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. अशातच डॉलरच्या तुलनेत रुपयाची प्रचंड घसरण सुरु असल्याने सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत.

Gold price hike dollar rate: गेल्या काही दिवसात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची  मोठी घसरण होताना दिसत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमती वाढण्यात झाला आहे. परिणामी एकाच आठवड्यात सोन्याच्या किंमतीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल  5000 रुपयांची वाढ होऊन एक तोळे सोन्याचा (Gold price) दर जीएसटीसह 1 लाख 31 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या (Dollar Vs Rupee) तुलनेत रुपयाची मोठी घसरण सुरु आहे. रुपयाने ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली आहे. कधी नव्हे ते रुपयाचा भाव एका डॉलरच्या तुलनेत नव्वद रुपयांहून अधिक झाला आहे. रुपयाचा भाव घसरल्याने सोन्याच्या आयात मूल्यात (Gold rate news) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी भारताला मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने सोन्याच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच आठवड्यात सोन्याचे दर हे  जीएसटीसह 126000 हजारावरु 131000 वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट मात्र बिघडणार आहे. (Gold latest price)

Gold price prediction: 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार?

वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका नोटमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांच्या दरम्यान होता. 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 127850  रुपये तोळा झाला आहे. सोन्याचे दर सध्याच्या स्तरावरुन 15 ते 30 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवला आहे. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127000 ते 130000 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 30 टक्क्यांची वाढ म्हणजे. साधारणपणे 35 हजार ते 40 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. 

Indian rupee vs Dollar: भारतीय रुपयाच्या दरात मोठी घसरण

गुरुवारी दिवसभरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 90.43 या पातळीपर्यंत खाली घसरला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबामुळे रुपयाला फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. रुपया कमकुवत झाल्याने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा खर्च वाढला आहे. अखेर काल रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपाच्या बातम्यांमुळे काल रुपया 19 पैशांनी वाढून 89.96 या पातळीवर बंद झाला होता. 

आणखी वाचा

सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget