एक्स्प्लोर

Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 

Gold Rate Hike : वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या मते 2026 मध्ये सोन्याचे दर आता आहेत त्यापेक्षा 15 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतात. 2025 मध्येच सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढलेत. 

नवी दिल्ली: 2025 हे वर्ष सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न देणारं ठरलंय. कारण, या वर्षी सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढलेत. म्हणजेच ज्यांनी डिसेंबर 2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक केली असेल त्यांना जोरदार फायदा झाला आहे. आगामी 2026 या वर्षात सोनं आणखी महाग होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोन्याचे दर सध्याच्या स्तरावरुन 15 ते 30 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनं हा अंदाज वर्तवला आहे.  म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127000 ते 130000 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 30 टक्क्यांची वाढ म्हणजे. साधारणपणे 35 हजार ते 40 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. 

Gold Rate Hike : सोने आणखी महागणार

वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका नोटमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढले आहेत. अमरिकेचं टॅरिफ आणि भूराजनैतिक अस्थिरतेच्या कारणामुळं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्यानं त्यांनी सोन्यात गुंतवणूक केली. 2025 मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं.  वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार डायवर्सिफिकेशन आणि स्थिरता लक्षात गेता केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली.

वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार कोसळत असलेले यील्ड, वाढता राजनैतिक तणाव यामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली.  या परिस्थितीत सोन्याचे दर 2026 मध्ये  15 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतात.  

2025 मध्ये ग्लोबल गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडस्मध्ये 77 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक गुंतवणूक झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या डेटानुसार त्यांच्या होल्डिंगमध्ये 700 टनाहून अधिक सोनं जमा झालंय. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजे 2026 मध्ये जर सोन्याचे दर घसरले तर 5 ते 20 टक्क्यांची घसरण होऊ शकते. 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोनदा सोन्याचे दर जाहीर केले जातात. त्यांच्या वेबसईटनुसार 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127850 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 124780  रुपये आहे. तर, एक तोळे 20 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी 113780 रुपये मोजावे लागतील.   

2025 मध्ये सोन्याच्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळाले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांच्या दरम्यान होता. 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 127850  रुपये तोळा झाला आहे. म्हणजेच जवळपास 52000 रुपयांची वाढ झालीय. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर 86000 रुपये किलो होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर 184727 रुपयांवर पोहोचला. 

 4 डिसेंबरचे सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 

24 कॅरेट सोने : 127850 रुपये
22 कॅरेट सोने : 124780 रुपये
20 कॅरेट सोने : 113780 रुपये
18 कॅरेट सोने : 103550 रुपये
14 कॅरेट सोने : 82460 रुपये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget