Maharashtra Live blog: शीतल तेजवानीच्या पिंपरीतील घरी पुणे पोलिसांची झाडाझडती; महत्वाचे पुरावे हाती लागणार?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील अमित देशमुख यांचा व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर पहिल्या उचलीच्या मागणीसाठी चार दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या मध्यस्थीने 2725 रु पहिल्या उचलीवर मागे घेण्यात आले असुन जिल्ह्यातील ऊसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ऊसदाराचे आंदोलनाचे लोन परभणी जिल्ह्यात पसरुन सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर 1 डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
युवा शेतकरी संघर्ष समिती,स्वाभिमानी शेतकरी संघटना,किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी यांचे मागील चार दिवसांपासून कारखाना परिसरात हे आंदोलन सुरू होते. कारखाना प्रशासनाने गुरूवारी याची दखल घेऊन तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीस तहसिलदार सुनिल कावरखे, सोनपेठ पोलिसांचे पोलिस निरिक्षक अशोक गिते, अजय किरकन ट्वेंटीवन शुगर्सचे विजय देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख,राजन क्षीरसागर,उदय देशमुख,अजय बुरांडे, सुधीर बिंदू, किशोर ढगे लक्ष्मण पौळ,विश्वंभर गोरवे, रामेश्वर मोकाशे,ॠषीकेश जोगदंड, सुरेश ईखे , ओमकार पवार यांच्या सह परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत ऊस दरावर यशस्वी चर्चा होऊन यंदाच्या गाळप हंगामात पहिली उचल 2 हजार 725 प्रति मेट्रिक टन देण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
शीतल तेजवानीच्या पिंपरीतील घरी पुणे पोलिसांची झाडाझडती. महत्वाचे पुरावे हाती लागणार?
पुणे : शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलीस पोहचलेत. पोलिसांकडून इथं झाडाझडती घेतली जातीये. पोलीस कोठडीत असलेल्या शीतल कडून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरी आलेत. खरं तर शीतल आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पुणे पोलिसांना आहे.
पुण्याहून मुंबई, दिल्ली, बेंगलोर ला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर भिडले गगनाला
पुण्याहून मुंबई, दिल्ली, बेंगलोर ला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर भिडले गगनाला
इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान सेवा कंपन्यांचे दर वाढले
पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट ६१ हजारांवर
पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार तर पुण्याहून बंगलोरसाठी मोजा ४९ हजार रुपये
सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांशी झुंजत असल्याने प्रवाशांना फटका
विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपट
देशभरातून इंडिगो ची तब्बल ६००हून अधिक विमाने आज रद्द
रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या मागील दिवसांपेक्षाही जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या























