एक्स्प्लोर

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या उपस्थितीत बडोद्यानं दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. बडोद्यानं पंजाबला आणि त्यानंतर गुजरातला पराभूत केलं.

हैदराबाद : बीसीसीआयची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरु आहे. भारताच्या राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू त्यांच्या राज्याकडून या स्पर्धेत खेळत आहेत. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या बडोद्याच्या संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दोन सामने खेळला. बडोदा विरुद्ध पंजाब आणि बडोदा विरुद्ध गुजरात या दोन सामन्यात हार्दिक पांड्या बडोद्याकडून खेळला. हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी हैदराबादमध्ये मोठी गर्दी होत असल्यानं आयोजकांना मैदान बदलावं लागल्याचं समोर आलं आहे. हार्दिक पांड्याची भारताच्या टी 20 संघात निवड देखील झाली आहे. 

आयोजकांवर सामना दुसऱ्या मैदानात हलवण्याची वेळ 

हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बडोद्याकडून तीन सामने खेळेल अशी शक्यता होती. बडोदा विरुद्ध पंजाब ही मॅच हैदराबादच्या जिमखाना मैदानावर पार पडली होती. त्या मॅचमध्ये एका चाहत्यानं मॅच सुरु असताना धावत जाऊन हार्दिक पांड्यासोबत सेल्फी काढली होती. हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी अनपेक्षितपणे वाढणारी गर्दी आणि सुरक्षेच्या कारणावरुन बडोदा विरुद्ध गुजरात या सामन्याचं आयोजन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मैदानावर करण्यात आलं. 

बडोद्याचा दोन्ही सामन्यात विजय

हार्दिक पांड्यानं बडोद्याकडून पंजाब आणि गुजरात विरुद्धचे सामने खेळले. या दोन्ही सामन्यात बडोद्याला विजय मिळाला. हार्दिक पांड्यानं पंजाब विरूद्धच्या सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करताना  1 विकेट घेत 52  धावा दिल्या होत्या. तर, गुजरात विरुद्ध हार्दिक पांड्यानं  4 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 16  धावा दिल्या. हार्दिकनं पंजाब विरुद्ध नाबाद 77 धावांची खेळी करत बडोद्याला विजय मिळवून दिला होता. तर, गुजरात विरुद्ध त्यानं तो 10  धावा करुन बाद झाला. त्याची विकेट रवि बिश्नोईनं काढली. 

हार्दिक पांड्या बडोद्याकडून तीन सामने खेळेल अशी शक्यता होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याची निवड झाल्यानं बडोदा संघासोबतचा त्याचा प्रवास संपला आहे. हार्दिक पांड्यानं दोन सामन्यात बडोद्यासाठी दमदार कामगिरी केली. बडोदा विरुद्ध हरियाणा ही मॅच 6 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच हार्दिक पांड्या टी 20 मालिकेच्या तयारीसाठी कटकमध्ये लवकर दाखल होणार आहे. 

हार्दिक पांड्या आशिया चषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे, टी 20 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता. आता हार्दिक पांड्यानं टी 20 संघात कमबॅक केलं आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Embed widget