एक्स्प्लोर

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर

दिव्यांग केंद्र आमच्या हक्काचे...नाही कोणाच्या बापाचे, मैदान खाणाऱ्या सिडको बकासुरच करायचं काय... खाली डोकं वर पाय, नेरुळकरांनो विकास हवा की गामी अशा घोषणांनी मनसेनं परिसर दणाणून सोडला.

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-28 येथील उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस स्थानकासाठी आरक्षित भूखंड सिडकोने निविदा काढून गामी या खासगी बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने नावापुरती राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. परंतु, पालिकेची बोटचेपी भूमिकेला डावलून मुजोर सिडको च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्यवहार घडवून आला. मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने(MNS) या व्यवहाराला तीव्र विरोध करत सेक्टर-28 येथे या भूखंडा शेजारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात नेरुळ (Navi mumbai), सीवूड्स, जुईनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मनसेच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला. 

दिव्यांग केंद्र आमच्या हक्काचे...नाही कोणाच्या बापाचे, मैदान खाणाऱ्या सिडको बकासुरच करायचं काय... खाली डोकं वर पाय, पोलिस स्थानकाचा भूखंड खाणाऱ्या सिडकोचा निषेध असो, नेरुळकरांनो विकास हवा की गामी हवा अशा घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आम्ही शांततेत आंदोलन केले आहे. परंतु जर येत्या 7 दिवसात सिडकोने हा व्यवहार रद्द नाही केला तर मनसे या भूखंडावर उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस स्थानकासाठी आरक्षित भूखंड असा फलक लावेल आणि या भूखंडावर गामी बिल्डरला एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा गजानन काळे यांनी दिला. तसेच भगत सिंग यांच्यासारखं नागपूर अधिवेशनात घुसून आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला. दरम्यान, धरणे आंदोलनात मनसेचे नवी मुंबईतील विविध पदाधिकारी आणि स्थानिकांची उपस्थिती लक्षणीय होती. 

विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा

दरम्यान,  मनसेच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला.शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक विशाल ससाणे, विभागप्रमुख विशाल विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे दिलीप चव्हाण, प्रहार जनशक्ती चे मनोज टेकाडे, अजय तापकीर, सुनिल शिरीषकर, चंद्रकांत उतेकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्ष सुरेश मोकल, यांनी पाठिंबा दिला. तर नवी मुंबई सजग मंच चे सुधीर दाणी, नवी मुंबई जागृत रहिवासी संघ सुनील चौधरी सर, रणजित निंबाळकर, सुरेश साडे, सत्यवान आंब्रे ज्येष्ठ नागरिक संघ, सीवूड्स अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी अध्यक्ष बाबा क्षिरसागर, खजिनदार शिवाजी बागडे, अरविंद जयकर यांनी सुद्धा पाठिंबा दिला. 

हेही वाचा

शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget