एक्स्प्लोर
In Pics : अथक परिश्रम अन् मेहनतीच्या जोरावर मेस्सीनं साकार केलं स्वप्न, अखेर उंचावला फिफा विश्वचषक
FIfa WC 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू फुटबॉलपटू लिओनल मेस्सीनं अखेर फिफा विश्वचषक उंचावला. अर्जेंटिनाने फ्रान्सला फायनलमध्ये मात देत ही कमाल केली.
Lionel Messi
1/10

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला.
2/10

आधी अतिरिक्त वेळ त्यानंतर पेनल्टी शूटआऊट असं सारंकाही असणाऱ्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला.
3/10

आणि संपूर्ण कारकिर्द फिफा विश्वचषकाची वाट पाहिलेल्या मेस्सीनं अखेर आपलं आणि देशाचं स्वप्न पूर्ण करत फिफा वर्ल्ड कप उंचावला.
4/10

विशेष म्हणजे ज्या मेस्सीसाठी अर्जेंटिनाला हा कप जिंकायचा होता, त्या मेस्सीनेच सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले.
5/10

विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने उत्कृष्ट खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली.
6/10

विशेष म्हणजे फ्रान्सचा 23 वर्षीय स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे याने देखील कडवी झुंज देत हॅट्रिक केली, एकूण चार गोल करत त्यानं अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले, पण तो जिंकू शकला नाही.
7/10

अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. फायनलच्या या पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडली.
8/10

अर्जेंटिनाच्या स्ट्रायकर्सने देखील एकही संधी व्यर्थ न घालवत एक किक राखून 4-2 ने पेनल्टी शूटआऊट जिंकला आणि सामन्यासह विश्वचषक 2022 अर्जेंटिनाला जिंकवून दिला.
9/10

त्यामुळं वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजारानं ग्रासलेल्या मेस्सीनं खडतर प्रवास करत अखेर विश्वचषक जिंकत कारकिर्दीची हॅपी एडिंग केली आहे.
10/10

क्लब फुटबॉल गाजवून अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा संघ बनवण्यापासून विश्वचषक विजयापर्यंतचा मेसीचा प्रवास खरचं वाखाणण्याजोगा आहे.
Published at : 19 Dec 2022 09:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























