एक्स्प्लोर
IND vs WI : भारताच्या पहिल्या डावात राहुल, ध्रुव जुरेल अन् रवींद्र जडेजाचं शतक, 18 वर्षानंतर पहिल्यांदाच धडाकेबाज कामगिरी,टीम इंडियाचा अहमदाबाद कसोटीत डंका
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीवर भारतानं पूर्ण वर्चस्व मिळवलं आहे. दुसऱ्या दिवशी भारताच्या तीन खेळाडूंनी शतक पूर्ण केलं.
भारताची पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी
1/6

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी अहमदाबाद येथे खेळवली जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतचं वर्चस्व दिसून येत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 162 धावांवर रोखलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारतानं 5 बाद 448 धावा केल्या आहेत.
2/6

भारतातर्फे पहिल्या डावात तीन खेळाडूंनी शतक पूर्ण केलं आहे. एका डावात भारताच्या तीन खेळाडूंनी शतक करण्याची या वर्षातील ही तिसरी वेळ आहे. टीम इंडियानं याद्वारे नवा विक्रम रचला आहे.
3/6

एका कॅलेंडर वर्षात 3 वेळा कसोटी सामन्यात एका डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतक करण्याची भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी वेळ आहे. भारताच्या फलंदाजांनी अशी कामगिरी पहिल्यांदा 1979 मध्ये केली होती. त्यानंतर 1986 आणि 2007 मध्ये अशी धमाकेदार फलंदाजी भारतीय फलंदाजांनी केली होती. आता 18 वर्षानंतर भारताच्या फलंदाजांनी एका कॅलेंडर वर्षात 3 वेळा कसोटी सामन्यातील एका डावात तीन फलंदाजांनी शतक केलं आहे.
4/6

भारताच्या फलंदाजांनी 2025 मध्ये पहिल्यांदा एका डावात तीन शतकं इंग्लंड विरूद्धच्या लीडस कसोटीत केली होती. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंतनं त्या कसोटीत शतक केलं होतं.त्यानंतर मँचेस्टर कसोटीत शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी एकाच डावात शतक पूर्ण केलंय. ही एका कॅलेंडर वर्षातील तिसरी वेळ आहे.
5/6

भारतानं आज 2 बाद 121 धावांवरुन फलंदाजीला सुरुवात केली. केएल राहुलनं 100 धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिलनं 50 धावा केल्या. तर ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजानं 206 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलनं 125 धावा केल्या तर रवींद्र जडेजानं कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक करत धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. रवींद्र जडेजा 104 धावांवर नाबाद आहे.
6/6

पहिल्या कसोटीवर भारतानं चांगली पकड निर्माण केली आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 162 धावांवर रोखलं. त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजनं दमदार गोलंदाजी केली. दुसरा दिवस भारताच्या फलंदाजांनी गाजवला. सध्या भारताकडे 286 धावांची आघाडी आहे. भारतानं अशीच कामगिरी ठेवल्यास विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेऊ शकतात.
Published at : 03 Oct 2025 08:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























