भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी भारतासाठी 12 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
2/7
अरुण लाल यांची होणारी पत्नी बुलबुल साहा (Bulbul Saha) 38 वर्षांची आहे. दोघांच्या वयात 28 वर्षांचा फरक आहे. अरुण लाल आणि बुलबुल 2 मे रोजी कोलकातामध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.
3/7
सध्या दोघांची लग्नपत्रिका आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4/7
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती यांचा विवाह पार पडणार आहे.
5/7
अरुण आणि बुलबुल यांचा एका महिन्याआधी साखरपुडा झाल्याची माहिती आहे.
6/7
नुकताच यांचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7/7
अरुण लाल यांचं लग्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांची होणारी पत्नी आणि त्यांच्या वयात 28 वर्षांचा फरक आहे.