Suresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं
Suresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं
मोदीजी यांच्या सोबतच अंतर खूप लांबच होत पण या निमित्ताने आज आम्हाला त्यांना जवळून भेटता येणार आहे ऑन धनंजय मुंडे - काल कराडला अटक झाल्या नंतर ते आता गेले असतील त्यांचा तो मतदार संघ आहे आकाचे लोक आले तर ते मुंबई सुद्धा बंद करू शकतात कराड सोबत माझे आधी चांगले संबंध होते पण लोक मारायला लागल्यावर अश्या लोकांसोबत कसे संबंध ठेवायचे ऑन बीड NCP बरखास्त त्यांच्या पक्षाने ती कारवाई केली आहे ऑन कराड आई त्या माऊली बद्दल मला काही बोलायच नाही
हे ही वाचा..
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.