एक्स्प्लोर

Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त

Hemlata Patil : फेसबुक पोस्ट लिहून हेमलता पाटलांनी आधी आपली नाराजी, मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

नाशिक: राज्यात लोकसभा, विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील (Hemlata Patil) या काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देण्याचा तयारीत असल्याच्या आणि त्यांचा पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यावर हेमलता पाटील (Hemlata Patil) ठाम होत्या. दुपारी चार वाजेपर्यंत मला विधानसभा तिकीट देण्याचे नक्की असताना अचानक शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याचा हेमलता पाटील (Hemlata Patil) यांचा आरोप आहे. 

पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष

विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील (Hemlata Patil) नाराज होत्या. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे. “पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गुल आहेत” अशा शब्दात हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, राज्यातील पक्ष नेतृत्वाने फसवल्याचा हेमलता पाटील यांचा गंभीर आरोप आहे. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कुठल्या पक्षात जायचं याबाबत अद्याप निर्णय नाही, इतर पक्षाकडून पक्षात प्रवेशासाठी संपर्क साधत असल्याचा पाटील (Hemlata Patil) यांचा दावा आहे. 

विधानसभेला बंडखोरी केली पण...

विधानसभा निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज देखील हेमलता पाटील यांनी भरला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. मात्र शेवटी त्यांनी 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली होती. 

हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट

हेमलता पाटील यांच्या नाराजीची चर्चा असतानाच आता त्यांनी त्यांची खदखद फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 'जेव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिक पणा ही तुमची कमजोरी समजली जाते .तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधा चा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी वाटलाची साठी आपल्या अशिर्वादाची', अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Embed widget