Walmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट
Walmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबात (Walmik Karad) अनेक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा (Walmik Karad) फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यानंतर वाल्मिक कराडने (Walmik Karad) पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक बाबुराव कराड (Walmik Karad) आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमत आहे. सध्या इथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.