सोलापुरातील दाराशा रुग्णालयातही कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयाला फुग्यांची सजावट केली आहे.
2/6
भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी देशभरातील तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या टप्प्यातील लसीकरण अभियानाची सुरुवात करतील.
3/6
कोल्ड स्टोअरेजमध्ये कोरोना लसीचा साठा करण्यात आला आहे. हीच ती लस आहे, जी आज आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
4/6
मुंबईतील कुपर रुग्णालयातही आज कोरोनाचं लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी सज्ज झाले आहेत.
5/6
आजपासून सुरु होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रही सज्ज आहे. ऐतिहासिक अशा या लसीकरणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. एखाद्या सोहळ्याप्रमाणे कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होत आहे.
6/6
सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचली जाणार आहे. लसीकरणाची कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महिला आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहिमेच्या तयारी करताना...