एक्स्प्लोर
Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस पलटली, कर्नाळा खिंडीतील घटना, तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
Private Bus Accident : रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला आहे.
कर्नाळा खिंडीत खासगी बसचा अपघात
1/6

मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बस कर्नाळा खिंडीत पलटली आहे.
2/6

खासगी बसच्या या अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
3/6

मुंबईच्या दिशेकडून कोकणाच्या दिशेकडे जात असताना खासगी बसला अपघात झाला. कोकणात जाणाऱ्या या खासगी बसमध्ये 35 हून अधिक अडकल्याची माहिती आहे.
4/6

कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात बसमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस मदतीसाठी रवाना झाले आहेत.
5/6

कर्नाळा खिंडीतील अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
6/6

खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
Published at : 04 May 2025 11:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























