एक्स्प्लोर
Raigad Boat Mishap Drown: उरणच्या खोल समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाली, बचावकार्य सुरु
Raigad Uran Boat Mishap: उरणच्या करंजा येथील समुद्रात एक मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुधवारी बुडाली होती. ही बोट बुडतानाचा व्हिडीओ व्हायरल
Uran Boat Mishap
1/9

उरण करंजा रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
2/9

गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे.
3/9

ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे.
4/9

या घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
5/9

मात्र, हा अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीतहानी झालेली आहे का? किती नुकसान झाले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
6/9

वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली, असा सवाल आता उपस्थित केली जात आहे.
7/9

सदर घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलीस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.
8/9

भारतीय नौदलाकडून अद्याप बोट दुर्घटनेच्या बचावकार्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
9/9

उरणच्या खोल समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाली, बचावकार्य सुरु
Published at : 21 Aug 2025 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























