एक्स्प्लोर
तासगाव ते गोविंद बाग ! आर.आर. आबांच्या सुपुत्राचा 'अंचंबित' करणारा हवाई प्रवास
शरद पवारांचा सहवास म्हणजे एक पर्वणीच असते. त्यातच, नव्याने राजकारणात येत असलेल्या तरुणांसाठी त्यांचा सहवास म्हणजे अनुभवाचे धडेच म्हणात येईल.
Rohit patil with sharad pawar
1/7

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सारथी व्हावं अशीही कित्येकांची इच्छा असते. शरद पवार आपल्या भागात राजकीय दौऱ्यासाठी आल्यावर आपण त्यांचे सारथ्य करावे असेही अनेकांना वाटते
2/7

शरद पवारांचा सहवास म्हणजे एक पर्वणीच असते. त्यातच, नव्याने राजकारणात येत असलेल्या तरुणांसाठी त्यांचा सहवास म्हणजे अनुभवाचे धडेच म्हणात येईल.
3/7

राज्याच्या राजकारणातील युवा नेते शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भेटीचा किस्सा किंवा भेटीतील चर्चा सोशल मीडियातून शेअर करत असतात.
4/7

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आज शरद पवारांसमवेत तासगाव ते गोविंदबाग असा हवाई सफर केला. या प्रवासात शरद पवारांनी विमानातूनच त्यांच्याशी बारामती व परिसरातील विविध बाबींवर चर्चा केली. रोहित यांनी हा प्रसंग व फोटो सोशल मीडियातून शेअर केले आहेत.
5/7

आज तासगाव ते गोविंद बाग हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त स्मरणामध्ये राहणारा प्रवास होता. तासगाव शेजारची गावे, लोढे तलाव याची माहिती मी शरद पवारांना दिली.
6/7

खटाव तालुक्यातील डोंगराळ भाग, दहिवडी सारख मोठं गाव, डोंगराळ भागावर पसरलेला सोलर प्रोजेक्ट आणि त्यानंतर मालेगाव कारखाना व साहेबांनी अभिमानाने दाखवलेलं बारामती शहर लक्षात राहिलं.
7/7

नीरा उजवा कालवा असं अनेक गोष्टींची माहिती तोंडपाठ साहेबांना असणं हे माझ्यासाठी अचंबित करणारी बाब होती. अनेक विषयांवर साहेबांनी केलेल मार्गदर्शन ही आयुष्याची मोठी शिदोरी राहील, अशा शब्दात हवाई सफरचं वर्णन रोहित पाटील यांनी केलं आहे.
Published at : 02 May 2024 05:59 PM (IST)
आणखी पाहा























