एक्स्प्लोर
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहराचं 'जिजाऊनगर' नामकरण करण्याची मागणी, पिंपरी-चिंचवडमध्ये 100 हून अधिक होर्डिंग्ज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केलीय
Feature Photo
1/10

राज्यात शहरांच्या नामकरणाचं लोण सुरू आहे.
2/10

त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहराचं नामकरण 'जिजाऊनगर' करण्याची मागणी होतेय.
3/10

ही मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानने केली आहे.
4/10

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे.
5/10

एवढंच नाही तर नामकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 100 हून अधिक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
6/10

यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आला आहे.
7/10

इथल्या मातीत उमटली आहेत पाऊले त्यांची इथल्या वाऱ्याने झेलले आहेत श्वास नि:श्वास त्यांचे इथल्या पाण्यात मिसळला आहे घाम त्यांच्या परिश्रमाचा आता होउ दे या आसमंतात जयजयकार त्या नावाचा आता पिंपरी चिंचवडचे नामकरण जिजाऊनगर करूया असे पोस्टरवर लिहिले आहे.
8/10

त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागलीय.
9/10

राज्यात अहमदनगरचं अहिल्यानगर, काही दिवसांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले आहे.
10/10

त्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी जोर धरु लागली आहे
Published at : 05 Jun 2023 10:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























