Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
एका एका प्रभागात 40 जण इच्छुक आहेत. गेल्या पंधरा वर्षात सत्ता काळात शहरासाठी केलेल्या कामामुळे काँग्रेसवर लोकांचा आणि उमेदवारांचाही विश्वास असल्याचं सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil on Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेस आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. काल मुलाखतीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आजही (17 डिसेंबर) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. एका एका प्रभागात 40 जण इच्छुक आहेत. गेल्या पंधरा वर्षात सत्ता काळात शहरासाठी केलेल्या कामामुळे काँग्रेसवर लोकांचा आणि उमेदवारांचाही विश्वास असल्याचं सतेज पाटील म्हणाले.
तर त्याला विधानसभेची उमेदवारी देतो
दरम्यान, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सतेज पाटील यांनी उमदेवारांना नाराज न होण्याचे आवाहन केले. सतेज पाटील म्हणाले की, जर कोणी जास्तच नाराज झाला असल्यास त्याला विधानसभेला उमेदवारी देतो, पण महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका. सतेज पाटील यांनी अशा पद्धतीने बोलताच इच्छुकांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, थांबायला सांगितल्यानंतर तुम्हाला काहीतरी शब्द द्यावा लागणार आहे. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नका, सगळेजण त्या उमेदवाराच्या पाठीशी राहा असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, तुमच्यातीलच इच्छुक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार आहे. मला उमेदवारी द्या म्हणून भेटा पण कुणाला उमेदवारी देऊ नका म्हणून सांगायला भेटू नका, असे ते म्हणाले. त्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.
कोल्हापूरवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल
दरम्यान, सतेज पाटील म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना गेल्या तीन वर्षात राज्य सरकारला कोल्हापूरसाठी ठोस असं काहीच करता आलेलं नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसकडून आघाडी करण्यासाठी चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्य पातळीवर काही चर्चा सुरू आहेत, स्थानिक पातळीवर काही लोकांच्या अड्जस्टमेंट झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये काही आमच्याकडे प्रस्ताव नाही. वंचितची आज (17 डिसेंबर) कोल्हापुरातील दसरा चौकात होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























