Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे यांच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत
आज चर्चेला पूर्णविराम मिळेल
काल संध्याकाळीही काही प्रमाणात चर्चा झाल्या
मुंबईचा विषय आज संपण्याची शक्यता
लवकरच कल्याण-डोंबिवली, ठाणे मधील निवडणुकांसंदर्भातही चर्चा अंतिम टप्प्यात आहे
त्यानंतर 1-2 दिवसांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चेकरता बसतील
आमचं भाजप आणि शिदेंच्या युतीसारखं भिजत घोंगडं नाही
दोन बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर सभाही करतील.
शिवतीर्थावर प्रचाराच्या सभा फक्त शिवसेनाच करत आली आहे
शिंदे गटांच्या सभा वगैरे हे बुडबुडे आहेत
शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्टट्युब बेबी आहे
त्यांचा नॅच्युरल जन्म नाही
हा जन्म तात्पुरता आहे
शिवतीर्थाशी संबंध हा फक्त ठाकऱ्यांचाच आहे
आमची भूमिका आहे की निवडणूक आयोग हरिश्चंद्राच्या भूमिकेत असावं
मात्र निवडणूक आयोग हरामखोर आहे
निवडणूक आयोग हरामखोर असल्यानं पक्षांतरबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नाही





















