Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Manikrao Kokate Arrest Warrant: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे. कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणीही असो, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, असे अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी म्हटले.
माणिकराव कोकाटे यांनी कालच न्यायालयात हजर राहणे, अपेक्षित होते. मात्र, ते काल सुनावणीला हजर राहिले नाहीत,यावरुन न्यायालयाने त्यांना फटकारले. माणिकराव कोकाटे हे अटक टाळण्यासाठी कालच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्या अंजली दिघोळ यांनी केला. दरम्यान, आजच्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. परंतु, कोकाटे यांनी तशी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील वकील आशुतोष राठोड यांनी केला.





















