एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune-Bengaluru Expressway : काळाचा घाला, पुणे-बंगळुरु महामार्गावरील भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी
Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Pune Bengaluru Expressway Accident
1/9
![पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/e54096c4730eb1d367a8a33720bc751500da6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2/9
![मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/3ea0975737d4238f022e1a3d3c06ffaaeff69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला.
3/9
![ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही खासगी बस नीता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. ही बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/b982fe90a235a79ec540995a368ceb1dc4c20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही खासगी बस नीता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. ही बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती.
4/9
![बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात झाला. ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/18a92065c7a04da0a2299dbe922173e4e6e74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात झाला. ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.
5/9
![चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/416a8ad55ede6b634b920e2e45507dd4d5c6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतं.
6/9
![अपघाताची माहिती मिळताच यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकूण 7 अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/1da2fdfe6f9c1f28cb0323197f6aa673f8e78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघाताची माहिती मिळताच यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकूण 7 अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली.
7/9
![बचाव पथकाच्या जवानांनी बसच्या मागील बाजूची काच फोडून दोरीचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/eb4bda51b8d2a722de112c7125598d812ef0d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बचाव पथकाच्या जवानांनी बसच्या मागील बाजूची काच फोडून दोरीचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं.
8/9
![जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 22 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/088f09518cb30eecf4d91995092826eb83e76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 22 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
9/9
![दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे आंबेगाव इथे मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करत आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/aa56cbd4e65143c1948ba0adee209f3062058.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे आंबेगाव इथे मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करत आढावा घेतला.
Published at : 23 Apr 2023 12:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)