Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Labour Code : श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून नवे लेबर कोड लागू झाल्यानंतर टेक होम सॅलरी कमी होणार की वाढणार याबाबत एक उदाहरण देत समजावून सांगितलं गेलं आहे.

नवी दिल्ली : चार नवे लेबर कोड लागू झाल्यानंतर नोकरदारांसर्भातील अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. काही नियमांबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टेक होम सॅलरी वाढणार की कमी होणार? केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. देशात चार लेबर कोड 21 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
टेक होम सॅलरी कमी होणार नसल्याचा दावा
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मते नव लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीत कसलाही फरक पडत नाही. जर पीएफ कपातीची वैधानिक मर्यादा 15000 रुपये ठेवली तर, असं श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं. मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे हे समाजवून सांगितल आहे. ज्यामुळं वेतनश्रेणीत बदल झाले तरी टेक होम सॅलरीवर परिणाम होणार नाही.
मंत्रालयानं हे एक उदाहरण देत समजावून सांगितलं आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे एकूण वेतन 60000 रुपये असल्यास आणि त्यामध्ये 20 हजार मूळ वेतन आणि 40000 विशेष भत्ते असा समावेश असू शकतो. नव्या वेतन एकूण वेतनाच्या 50 टक्के रक्कम मूळ वेतन मानली जाईल. त्यामुळं या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 30000 रुपये मानलं जाईल. याशिवाय पीएफ कपातीसाठी 15000 रुपयांची कमाल मर्यादा निश्चित केल्यास कंपनी आणि कर्मचारी यांच्याकडून होणारी पीएफ कपात 1800- 1800 अशी असेल.
केंद्रीय श्रम मंत्रालयानं जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार 60000 रुपये वेतन असलेल्या टेक होम पगार 56400 रुपय असेल. कर्मचारी इच्छा असल्यास 15000 रुपयांपेक्षा अतिरिक्त रुपयांची मर्यादा असेल. ही रक्कम स्वेच्छेनं गुंतवावी लागेल. दरम्यान ट्रस्ट आणि वेज कोडसंदर्भात अनेक गोष्टी लक्षात आलं की विविध प्लॅटफॉर्मवरुन केले जाणारे दावे खोटे होते.
कोणते लेबर कोड लागू?
द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 चार संहितांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. हे चार कामगार कायदे लागू केल्याबाबतची घोषणा 21 नोव्हेंबरला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी केली होती. त्यानंतर नव्या लेबर कोडमुळं पीएफमधील योगदान वाढेल, त्या तुलनेत टेक होम सॅलरी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता टेक होम सॅलरीबाबत केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं सर्व काही स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरातील 29 कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी चार लेबर कोड लागू करण्यात आले आहेत.























