Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
एरवी जंगलात आढळणाऱ्या बिबट्यानं आता भरवस्तीत एण्ट्री करत अनेकांची पळता भुई थोडी केलीय...बिबट्याच्या भीतीपोटी लोक कुठे रात्र-रात्र जागून काढतायत...तर कुठे शाळांना सुट्टी देण्याची वेळ येतेय...या बिबट्यांना रोखायचं कसं हीच सध्या राज्यासमोरची मोठी समस्या बनलीय...गावातल्या पारापासून ते विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत चर्चा आहे ती बिबट्याचीच...बिबट्यांना बंदोबस्त करणाऱ्यासाठी कल्ला करणाऱ्यांची आणि सल्ला देणाऱ्यांची काही कमी नाही...पाहुयात अधिवेशनात रंगलेल्या बिबट्याबाजीचा हा स्पेशल रिपोर्ट...
कोण बिबट्याच्या वेशात वेशात अधिवेशनात येतोय...
तर कुणी बिबट्याला अटकाव कसा करायचा याचे सल्ले देतोय...
राज्यभरात अनेक भागात लोकांना सळो की पळो करून सोडणारा बिबट्या
नागपूर अधिवेशनातही गाजतोय...
बिबट्यांच्या धुमाकुळानं सर्वाधिक बेजार झालेत ते जुन्नरचे लोक...
त्याचं गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी जुन्नरचे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट बिबट्याचाच वेश धारण करून अधिवेशनात धडक दिली...
त्याच वेशात ते सरळ सभागृहात जाऊन बसले...
बिबट्यांना कसं आवरायचं याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे...
सरकारला सल्ला देण्यासाठी आता आमदारांनी पुढाकार घेतलाय...
आणि बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नामी उपाय सुचवलेत...
संजय गायकवाडांचा सल्ला ऐकला तर चाट पडाल...
पण विरोधकच काय शिवसेनेच्या आमदारांच्याही गायकवाडांचा हा सल्ला पचनी पडला नाहीय...
भाजपच्या आमदार आशिष जयस्वाल यांनी वेगळाच सल्ला दिलाय़...
लोकप्रतिनिधी करत असलेल्या चर्चेचा बिबट्यांना मात्र थांगपत्ता नाही...
खुद्द नागपूरसह राज्यातल्या अनेक भागांत त्यांचा धुमाकूळ सुरूच आहे...
बीडमधल्या आष्टी तालुक्यातल्या डोईठाण धामणगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला...त्यामुळे गावकरी घाबरलेत...
येवल्यात रस्त्यालगत बिबट्या लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावला खरा...
पण सरावलेल्या बिबट्यानं धूम ठोकत अधिकाऱ्यांना गुंगारा दिला...
etxm nsk yeola undirwadi bibatya TREATED vis 091225 OR
रायगड जिल्ह्यातल्या नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झालेत...
बिबट्याच्या दहशतीमुळे तिथल्या बुधवारी शाळा बंद ठेवण्याची वेळ आली...
जुन्नरमध्ये बिबटे आणि दोन बछडे सीसीटीव्हीत आढळले...
गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरेगावात बिबट्याची दहशत वाढलीय...
वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्यानं गावकरी नाराज आहेत...
बदलापूरच्या अंबेशिवमध्ये बिबट्यानं एंट्री केल्यानं लोक घाबरलेत...
आधीच अनेक प्रश्नांना तोंड देणाऱ्या सरकारची डोकेदुखी बिबट्यांनी वाढवलीय...
आमदारांच्या अजबगजब सल्ल्यांमुळे क्षणभराची करमणूक होईल...पण बिबट्यांचा धुमाकूळ मात्र सुरूच राहील...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...
All Shows

































