एक्स्प्लोर
Photo | चपातीमध्ये चक्क बिर्याणी!
Feature_Photo_10
1/7

खवय्यांची राजधानी असलेल्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यंजन नेहमी दिसून येतात.. सुजाताची मस्तानी ते बेडेकरांची मिसळ, पुण्यातील खवय्ये खाण्यासाठी गर्दी करताना नेहमी दिसतात. कल्पकतेने बनवलेले पदार्थ इथे जागोजागी पाहायला मिळतात.. असाचं एक पदार्थ सध्या खवय्यांची नवी आवड बनलाय, चला तर पाहूया.. (Photo:@balefirekebab/IG)
2/7

पारंपरिक चपाती मध्ये भरलेलं पुरण म्हणजेच पुरणपोळी आपल्या सर्वांना माहीत आहेच, पण सध्या पुण्यात मिळतीये ही भन्नाट पोळी.. या पोळीत पूरण नाही तर चक्क भरतात 'बिर्याणी'! (Photo:@balefirekebab/IG)
3/7

या पदार्थाला व्हेज पोटली असं नाव या रेस्टॉरंट मालकाने दिलंय.. (Photo:@balefirekebab/IG)
4/7

या पोटली मध्ये भरभरून व्हेज बिर्याणी भरलेली असते, ही पोटली खाण्यासाठी तुम्हाला पुण्यातल्या मोशी मध्ये जावं लागेल. (Photo:@balefirekebab/IG)
5/7

या पोटलीची किंमत अंदाजे 320 रुपये असून, ती व्हेज आणि नॉन व्हेज अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.. (Photo:@balefirekebab/IG)
6/7

या भन्नाट पोटलीचा आस्वाद घेण्यासाठी सध्या पुणेकर गर्दी करतायत.. (Photo:@balefirekebab/IG)
7/7

चपातीमध्ये भरलेली बिर्याणी पुणेकरांच्या खास पसंतीस पडतीये.. (Photo:@balefirekebab/IG)
Published at : 05 Oct 2021 05:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























