एक्स्प्लोर

Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 

Railway Fare : भारतीय रेल्वेनं येत्या  26 डिसेंबरपासून रेल्वे प्रवासभाडं वाढवण्यचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं प्रवासभाडं वाढवण्याचं कारणं देखील सांगितलं आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. रेल्वेनं नव्य दरांची अंमलबजावणी येत्या  26 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचं म्हटलं. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलं.  

भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. 

Railway Fare Hike : रेल्वे प्रवास भाडेवाढ

जनरल तिकीटाचे दर 215 किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी 2 पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 2 पैसे अधिक मोजावे लागतील. 

रेल्वेनं प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडली आहे. प्रवास भाडे वाढवल्यानं रेल्वेला या वर्षात 600 कोटी रुपये मिळणार आहेत. 500 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 रुपये अधिक द्यावे लागतील. 

गेल्या 10 वर्षात रेल्वेनं नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्यानं खर्च 1,15,000 कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील 60 हजार कोटींनी वाढला आहे. 2024-25 मधील रेल्वे चालवण्याचा खर्च  263000 कोटी रुपये झाला आहे. 

रेल्वेनं वाढता मनुष्यबळ खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिलं आहे. त्यामुळं प्रवास भाडं कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या प्रयत्नांमुळं सुरक्षा वाढेल आणि रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढेल.  जगातील रेल्वे मालवाहतुकीत भारताचा दुसरा क्रमांक असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. 

भारतीय रेल्वेनं काही दिवसांपूर्वी दिवाळी आणि इतर सणांच्या कालावधीत 12000 पेक्षा अधिक विशेष फेस्टिवल ट्रेन चालवल्याचं म्हटलं आहे. 

दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढ

भारतीय रेल्वेनं 2025 मध्ये दुसऱ्यांदा  प्रवास भाडे वाढवलं आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेनं प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलै 2025 पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेनं प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल प्रवाशांना दिलासा 

उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर
सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात घसरण होणार? अहवालातून महत्वाची माहिती समोर
सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात घसरण होणार? अहवालातून महत्वाची माहिती समोर
IRCTC च्या नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच, तिकीट बुकिंग सुपरफास्ट होणार, रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज 
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,IRCTC च्या नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच, तिकीट बुकिंग सुपरफास्ट होणार

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget