एक्स्प्लोर
Parbhani Fire : परभणीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला भीषण आग
Parbhani Fire : परभणीतील जलसंपदा विगाभाच्या कार्यालयाला भीषण आग लागलीये.
Photo Credit - abp majha reporter
1/10

Parbhani Fire : परभणीच्या सेलुतील जलसंपदा विभाग कार्यालयात लोअर दुधना पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनला आज संध्याकाळी अचानक आग लागली.
2/10

या आगीत कार्यालयातील टेबल,खुर्च्यासह इतर साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
3/10

आग लागल्याची घटना कळताच आग विझवण्यासाठी सेलू पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
4/10

मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे या कार्यालयातील टेबल खुर्ची सह काही महत्त्वाचे कागदपत्रे ही जळून खाक झाले.
5/10

शासकीय कार्यालयाला आग लागण्याची घटना घडली असताना सुद्धा या ठिकाणी अद्यापपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही.
6/10

दरम्यान आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
7/10

या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केलाय.
8/10

पोलिसांचा तपास झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे आणि आग कशी लागली हे स्पष्ट होईल.
9/10

दरम्यान, या आगीमुळे कार्यालयातील आतील भाग जळून खाक झालाय.
10/10

शासकीय ऐवजही मोठ्या प्रमाणात जळालाय.
Published at : 08 Dec 2024 11:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
महाराष्ट्र


















