एक्स्प्लोर
Parbhani : परभणीत 4 वर्षांचा मुलगा बोअरवेलच्या खड्ड्यात पडला! बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू!
Ukkalgaon Village : परभणीच्या मानवत तालुक्यात ४ वर्षांचा मुलगा बोअरवेलच्या खड्ड्यात पडला, दहा ते पंधरा फूट खोल मुलगा अडकल्याची गावकऱ्यांची माहिती , मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू!
Ukkalgaon Village, Manwat
1/8

परभणी येथील 4 वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या खड्ड्यात पडला आहे
2/8

आई सोबत शेतात खुरपणीसाठी गेलेल्या चार वर्षाचा मुलगा शेतातील बोअरवेल साठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याची प्राथमिक माहिती आहे
3/8

परभणीच्या मानवत तालुक्यातील उक्कलगाव या परिसरातील ही घटना आहे खड्ड्यात पडलेल्या मुलाचे सोहम उक्कलकर असे नाव आहे
4/8

दुपारी बारा वाजल्यापासून सोहम या बोरवेलमध्ये पडलाय दहा ते पंधरा फुटांवर सोहम अडकला असून गावकरी त्याच्या संपर्कात आहेत
5/8

घटना घडलेली कळताच महसूल पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सध्या जेसीबीने या खड्ड्याच्या शेजारी खोदकाम सुरू करण्यात आले आहे..
6/8

मुलाला खड्ड्यातून काढायचे शर्तीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत, बोरवेलच्या खड्ड्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर जेसीबीने खोदकाम सुरू आहे
7/8

सोबतच त्याला ऑक्सिजन पुरवठा करून त्याच्याशी संपर्क साधला जातोय
8/8

मुलगा देखील याला प्रतिसाद देतोय, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे!
Published at : 09 Aug 2023 05:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
महाराष्ट्र


















