एक्स्प्लोर
Nashik Budhhpaurnima : 'बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि'; नाशिकमधील शंभर गावांना बुद्धमूर्तीचं दान
Nashik : बुद्धम् शरणम् गच्छामिचा उद्गोष करीत उपासक उपासिकांसह तथागत बुद्धांच्या शंभर मूर्ती प्रदान सोहळा नाशिक शहरात पार पडला.
Nashik Budhh Paurnima
1/10

'प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि संगम शरणम् गच्छामि' चा उद्गोष करीत उपासक उपासिकांसह तथागत बुद्धांच्या शंभर मूर्तींच्या प्रदान सोहळा नाशिक शहरात पार पडला.
2/10

नाशिक शहरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त 100 बुद्ध मूर्तींचे दान नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना करण्यात आले. यावेळी शुभ्र वस्त्रातील उपासक-उपासिकांसह शिस्तबद्ध दीर्घ रांगांमध्ये सजवलेल्या शंभरहून अधिक वाहन रथांवर भारुड असणाऱ्या तथागत बुद्धांच्या शंभर मूर्तींनी नाशिककरांचे लक्ष वेधले.
3/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्राट अशोक जयंती आणि बुद्ध जयंती तथा बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपच्या वतीने आयोजित मूर्ती प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली होती.
4/10

दरम्यान 23 एप्रिल ते दोन मे या कालावधीत जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील सहभागींपैकी प्रत्येक गावातील उपासकांमधून पाच श्रामनेरांची निवड करण्यात आली.
5/10

या उपक्रमातून शंभर गावासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे मूर्ती प्रदान करण्यात आल्या फायबर मेटल पासून बनवलेल्या बुद्ध मूर्ती सुमारे साडेपाच फूट उंचीच्या असून 100 गावांना या मूर्तींचे प्रदान करण्यात आले.
6/10

जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सटाणा, कळवण, निफाड, देवळा आदी तालुक्यातील गावांत शंभर बुद्ध मूर्ती दान करण्यात आल्या.
7/10

दोन दिवसांवर बुद्ध पौर्णिमा आली असून शहरात उत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून नाशिक (Nashik) शहरातून हजारो बांधवांसह बुद्धमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली.
8/10

प्रत्येकी साडेपाच फूट उंचीच्या तसेच फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या या बुद्धमूर्तींना गावागावांत दान करण्यात आले.
9/10

रंगबिरंगी फुलांनी व निळा झेंड्यांनी सजवलेल्या शंभर रथांमधून या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा काढण्यात आली.
10/10

जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव, दाभाडी, मळगाव, नांदगाव, खडकी, करंजगव्हाण, आगार, वडेल, निफाड तालुक्यातील नांदुर्डी, विंचूर, कसबे सुकेणे, रुई, गोंदेगाव, सारोळे, सटाणा तालुक्यातील टेम्भे, सोमपूर, अंतापूर, वनोळे, कर्जांड, तळवाडे, पारनेर, येवला तालुक्यातील पिंपळखुटे, रहाडी, खरवंडी, अडसुळे, बिलवणे, भायगाव आदी गावांसह इतर गावांना बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.
Published at : 03 May 2023 12:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
