एक्स्प्लोर
Nandurbar: नर्मदा काठावरील तरंगता दवाखाना धोकादायक स्थितीत, कर्मचाऱ्यांची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी धडपड
जीवघेण्या आणि धोकादायक तरंगत्या दवाखान्यातून तुटपुंज्या सुविधा असताना देखील आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजावत आहे.
Maharashtra News
1/10

सरदार सरोवरच्या निर्मितीनंतर नर्मदा काठावरील दुर्गम भागातील गावांना आरोग्य सुविधा देण्यासाठी अनेक अडचणी येत आहे.
2/10

सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे या भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी तरंगत्या दवाखान्यांची गरज ओळखून युरोपियन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने या ठिकाणी दिले.
3/10

गेल्या सतरा वर्षात तरंगता दवाखाना धोकादायक झाला आहे
4/10

जीवघेण्या आणि धोकादायक तरंगत्या दवाखान्यातून तुटपुंज्या सुविधा असताना देखील आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजावत आहे.
5/10

प्रतिकूल परिस्थितीत नर्मदा काठावरील बांधवांना सुविधा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.
6/10

2005 मध्ये युरोपीयन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले. आता हे तरंगते दवाखाने आता अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
7/10

गेल्या सतरा वर्षात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे
8/10

image 8
9/10

यातील एक दवाखाना तर 2015 मध्येच बुडाला असून त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे.
10/10

माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षा या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करुन त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला.
Published at : 05 Jan 2023 08:56 AM (IST)
आणखी पाहा























