एक्स्प्लोर
चरणमाळ घाटात भीषण अपघात; जनावरांनी भरलेला ट्रक पलटला, 26 रेड्यांचा मृत्यू, ट्रकचालक जखमी
गुजरातकडे निघालेला जनावरांचा ट्रक घाटातील तीव्र वळणावर उलटला आणि सुमारे 26 रेडे जागीच मृत्युमुखी पडले. ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
Nandurbar Accident
1/6

नंदूरबारच्या नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. जनावरांनी भरलेला एक ट्रक गुजरातकडे जात असताना घाटातील तीव्र वळणावर उलटला.
2/6

या अपघातात ट्रकमधील 35 रेड्यांपैकी 26 रेडे जागीच ठार झाले, तर उर्वरित जनावरे जखमी झाली आहेत.
3/6

ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4/6

सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. पिंपळनेर येथून म्हशी, वासरे आणि रेडे घेऊन एक ट्रक गुजरातकडे निघाला होता. मात्र, चरणमाळ घाटात आल्यानंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
5/6

त्यानंतर ट्रक घाटात सुमारे 20-25 फूट खोल खचात उलटला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, 26 रेड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर जनावरेही गंभीर जखमी झाले आहेत.
6/6

अपघातानंतर परिसरात जनावरांच्या वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नियम पाळले जातात का, यावरही प्रश्नचिन्ह आहे.
Published at : 19 May 2025 03:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















