एक्स्प्लोर
संतापजनक... आजी आजोबांना कंडक्टरकडून अपमानास्पद वागणूक, फुकटचे प्रवासी म्हणत बसमधून खाली उतरवलं!
Nandurbar News : शिरपूर आगाराच्या बसमध्ये वृद्ध प्रवाशांसोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उर्मट बस कंडक्टरने आजी-आजोबांना अपमानास्पद वागणूक देत बसमधून खाली उतरवलंय.
Nandurbar News
1/7

नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
2/7

बस कंडक्टरचा उर्मटपणा समोर आला असून वृद्ध आजी-आजोबांना कंडक्टरने खाली उतरवल्याचा प्रकार घडलाय.
3/7

अपमानास्पद वागणूक करत बसमधून आजी-आजोबांना उतरवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
4/7

हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी राहिली असती, असं बस कंडक्टर बोलत असल्याचं समोर आलं आहे.
5/7

बस खराब झाल्याने दुसऱ्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये वृद्ध आजी आजोबा चढत असताना हा प्रकार घडला.
6/7

बस कंडक्टरने केलेल्या या संतापजनक प्रकारानंतर सोशल मीडियावर बस कंडक्टर विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
7/7

बस कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Published at : 23 May 2025 03:02 PM (IST)
आणखी पाहा






















