एक्स्प्लोर
Nanded News: नांदेडच्या देळूब गावचा काबुली चणा आता सातासमुद्रापार
Nanded Chickpeas News : अर्धापूर तालुक्यातील देळूब परिसरात मोठया प्रमाणात काबुली हरभऱ्याची पेरणी केली जाते
Chickpeas
1/10

नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यात पोषक हवामानामुळे गेल्या 20 वर्षापासून शेतकरी काबुली चणा अर्थात हरभऱ्याची शेती शेतकरी करीत आहेत.
2/10

या काबुली चण्याला सातासमुद्रापार मागणी आहे. अमेरिका आणि दुबईला हा काबुली चणा निर्यात केला जातोय.
3/10

काबुली चणा म्हटलं की पंजाब , हरियाणा ही राज्ये आठवतात.
4/10

या राज्याप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन नांदेड जिल्ह्यातील देळूब इथं घेतलं जातंय.
5/10

अर्धापूर तालुक्यातील देळूब परिसरात मोठया प्रमाणात काबुली हरभऱ्याची पेरणी केली जाते
6/10

यंदा उत्पादनात प्रतिकुल वातावरणाचा फायदा काबुली हरभऱ्याला झालेला दिसून येत आहे.
7/10

एकरी दहा ते बारा क्विंटलचा उतारा मिळत असून एका क्विंटला 10 ते 12 हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
8/10

अर्धापूर तालुक्यातील देळूब बु. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात काबुली हरभऱ्याची पेरणी करतात.
9/10

गेल्या 20 वर्षांपासून रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून काबुली चण्याकडे पाहिले जाते.
10/10

काबुली हरभ ऱ्याच्या क्षेत्रफळात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे देळूब बु. गावाची काबुली हरभ ऱ्याचे गाव म्हणून ओळख बनली आहे. देळूब नांदेडला काबुली चण्याचेचे गाव म्हणून ओळखले जाते
Published at : 07 Mar 2023 11:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
