एक्स्प्लोर
Shiv Sena Clash : मुंबईतील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पाहा फोटो
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) कार्यकर्ते भिडले.
Shiv Sena Clash : मुंबईतील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पाहा फोटो
1/7

शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले.
2/7

दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली.
3/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला.
4/7

सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
5/7

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.
6/7

शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले.
7/7

17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवसैनिक येत असतात. स्मृतीदिन कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले होते.
Published at : 16 Nov 2023 10:16 PM (IST)
आणखी पाहा






















