मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या "बाळासाहेब चित्र आणि चरित्र' या छायाचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली.
2/10
मुंबई विद्यापीठामध्ये बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
3/10
मुंबईतील बिएनपीए संघटनेतील फोटोग्राफर्सनी विविध कार्यक्रमावेळी काढलेले फोटोस प्रदर्शन स्थळी लावण्यात आले आहेत.
4/10
हे प्रदर्शन पाहण्यासाठी शरद पवार, अदित्य ठाकरे ,संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते मंडळी येऊन गेले आहेत.
5/10
हे प्रदर्शन 17 ते 19 मे पर्यंत आयोजित करण्यात आले होते.
6/10
मात्र त्याचा प्रतिसाद पाहता 21 मे पर्यंत वाढवण्यात आलं.
7/10
या प्रदर्शनात विविध फोटोग्राफर्सनी काढलेल्या 1500 छायाचित्रांपैकी 75 निवडक छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली होती.
8/10
या प्रदर्शनाचा आज समारोप झाला. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणी जागवल्या.
9/10
या ठिकाणी शरद पवारांनी भेट दिली आणि बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या.
10/10
ठाकरे-पवार मैत्रीचा उल्लेख करून आज बाळासाहेब हवे होते, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले होते.