महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला.
2/6
मंगळवारी रवाना झालेली एक्सप्रेस ही सात टँकरसह विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. अंदाजे 24 तासात ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचेल आणि त्यानंतर तिथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल.
3/6
या एक्सप्रेससाठी राज्य सरकारकडून रेल्वेला टँकर्स पुरविण्यात आलेले असून रेल्वे हे रिकामे टॅंकर घेऊन देशातील विविध शहरांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवणार आहेत.
4/6
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असल्याने ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भेडसावत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा वापर करून त्यांची वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली होती.
5/6
या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने पुढे येत रो रो सर्विसचा वापर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मध्य रेल्वेचे कळंबोली आणि पश्चिम रेल्वेचे बोईसर स्थानक निश्चित करून त्या ठिकाणी रॅम्प बांधण्यात आले आहेत.
6/6
मंगळवारी सुटलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून 10 टँकर्स पाठवण्यात येणार होते. मात्र 4 टँकर्सची उंची जास्त असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. शेवटी 7 टँकर्स घेऊन ही गाडी निघाली.